पुण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा सहकाऱ्यांनी केला विनयभंग; गुन्हा दाखल

molestation-1

पुण्यातील शिवाजीनगरमध्ये असलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा दोन सहकाऱ्यांनी विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी 25 वर्षांच्या महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार डॉ. योगेश भद्रा व डॉ. अजय बागलकोट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला डॉक्टर आणि डॉ. योगेश व डॉ. अजय शिवाजीनगरमधील जम्बो कोविड रुग्णालयात कार्यरत आहेत. दोन दिवसापूर्वी महिला डॉक्टर कामावर असताना दोन आरोपींनी अश्लील वर्तन करत त्यांचा विनयभंग केला. याप्रकरणी महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी दुपारी गुन्हा दाखल केला आहे. तिघेही डॉक्टर एका खासगी कंपनीतर्फे जम्बो रुग्णालयात कार्यरत आहेत. मागील 15 दिवसांपासून ते दोन डॉक्टर महिला डॉक्टरला त्रास देत असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे अधिक तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या