सफदरजंगच्या दोन महिला डॉक्टरांना शेजाऱ्याकडून मारहाण, कोरोना पसरवत असल्याचा केला आरोप

686

कोरोना व्हायरसविरोधात डॉक्टर नर्स, मेडिकल स्टाफ जिवाची पर्वा न करता लढा देत आहेत. तरिही देशाच्या अनेक भागात लोकांकडून डॉक्टरांवरच हल्ला झाल्याचे वृत्त येत आहे. दिल्लीत देखील सफदरजंग रुग्णालयात आणिबाणीच्या परिस्थिती रुग्णांवर उपचार करणाऱ्या दोन महिला डॉक्टरांना समाजातील या विकृतीचा सामना करावा लागला आहे. या डॉक्टरांना त्यांच्या शेजाऱ्याने मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या शेजाऱ्याला अटक केली आहे.

सफदरजंग रुग्णालयात काम करणाऱ्या दोन महिला निवासी डॉक्टर बुधवारी रात्री फळं घेण्यासाठी घराबाहेर पडल्या त्य़ावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्याबाबत डॉक्टरांनी त्यांना जाब विचारताच त्या व्यक्तीने त्यांच्यावर कोरोना पसरवत असल्याचा आरोप केला. त्यावरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर त्या व्यक्तीने त्यांना मारहाण केली’, असे सफदरजंग रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशचे अध्यक्ष डॉ. मनिष यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या