व्हिडिओ-देवेंद्र फडणवीसांच्या सभेत गोंधळ

21

सामना ऑनलाईन । नांदेड

नांदेड महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांना घोषणाबाजीचा सामना करावा लागला. त्यांचं भाषण सुरु असताना काही जणांनी घोषणा द्यायला सुरुवात केली. हे सगळे जण शिवा संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे. फडणवीस यांनी या घोषणाबाजीकडे लोकांनी लक्ष देऊ नये असं सांगत गोंधळ घालणाऱ्यांना काँग्रेसने पाठवल्याचा आरोप केला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे, त्यांनी घोषणा का दिल्या हे मात्र अजून कळू शकलेलं नाही.

आपली प्रतिक्रिया द्या