जगातील पहिला फिजेट स्पिनर मोबाइल हिंदुस्थानात

स्पिनर खेळाने जगातच सर्वांना वेड लागले आहे. या खेळाची वाढती लोकप्रियता बघून हाँगकाँगमधल्या चिली इंटरनॅशनलने चक्क फिजेट स्पिनरच्या डिझाइन पासून प्रेरणा घेत फिजेट स्पिनर मोबाईलच बनवला आहे. जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच फोन असून तो नुकताच हिंदुस्थानी बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये जगातील पहिले असे ए-जीपीएस तंत्रज्ञानदेखील वापरण्यात आलेले आहे. हा फोन फोन म्हणून तर वापरता येणार आहेच, पण फिजेट स्पिनर आणि तुमच्या सध्याच्या मोबाईलसाठी ब्ल्यूटूथ म्हणूनदेखील वापरता येणार आहे. या फोनमध्ये मल्टिमीडियाचा समावेश करण्यात आलेला असून नेटवर्कची सुविधादेखील देण्यात आली आहे. के१८८ आणि एफ०५ अशा दोन प्रकारांत हा फोन उपलब्ध करण्यात आला असून अनुक्रमे १३००रु. आणि १७००रु. अशी यांची किंमत आहे.