जपान-कोलंबियाचा बाद फेरीमध्ये प्रवेश

49

सामना ऑनलाईन । मॉस्को

फिफा विश्वचषक २०१८ मध्ये आशियाई संघ जपानने अखेरच्या साखळी फेरीतील पराभव होऊनही बाद फेरीमध्ये प्रवेश केला आहे. कोलंबियाने सेनेगलचा १-० असा पराभव केल्याने जपानचा अंतिम १६ मधील प्रवेश निश्चित झाला.

मैदानावरचा ‘सुपरस्टार’ मैदानाबाहेर ‘देवदूत’

गुरुवारी अंतिम १६ मध्ये प्रवेश करण्यासाठी जपान, कोलंबिया आणि सेनेगल या संघांमध्ये सामना होणार होता. दोन्ही सामने एकाच वेळी सुरू झाले. कोलंबियाने येरी मिनाच्या गोलच्या बळावर सेनेगलाच पराभव करत त्यांना घरचा रस्ता दाखवला. कोलंबियाकडून विजयी गोल ७४ व्या मिनिटाला येरी मिना याने केला.

विश्वविजेत्यांना ‘साखळी’च्या बेड्या, जर्मनीने साधला पराभवाचा ‘अजब’ योगायोग

दुसऱ्या सामन्यामध्ये पोलंडने जपानचा १-० असा पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय मिळवला. सेनेगल आणि जपानचा पराभव झाल्याने दोन्ही संघाचे ४ गुण झाले. परंतु गोल फरकाच्या बळावर जपानने बाजी मारली आणि बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवला. पोलंडकडून जान बँड्नारेकने ५९ व्या मिनिटाला गोल करत संघाला पहिला विजय मिळवून दिला. ग्रुप एच मधून कोलंबिया आणि जपानने अनुक्रमे ६ आणि ४ गुण घेत बाद फेरी गाठली.

आपली प्रतिक्रिया द्या