फिफा : उरूग्वे विरूद्ध इजिप्त; सलाहच्या परफॉर्मन्सकडे चाहत्यांचे लक्ष

सामना ऑनलाईन । इकाटरिनबर्ग

फिफा विश्वचषकाच्या दुसऱ्या दिवशीची पहिली लढत दोनवेळा विश्वचषकाला गवसणी घातलेला संघ उरूग्वे आणि इजिप्तमध्ये रंगणार आहे. १९९०नंतर पहिल्यांदाच इजिप्त विश्वचषकाचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. विश्वचषकामध्ये इजिप्त संघाच्या परफॉर्मन्सची जबाबदारी मेन स्ट्रायकर मोहम्मद सलाहवर आहे.

जर्सी नंबर १० आणि तिचा इतिहास…

मागील महिन्यात यूएफा चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलच्या संघाकडून खेळताना सलाहच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर सलाह विश्वचषक खेळू शकेल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु इजिप्तचे प्रशिक्षक हेक्टर कूपर यांनी, सलाह दुखापतीतून सावरला असून तो उरूग्वे विरूद्धच्या सामन्यामध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले आहे.

‘रोनाल्डो’साठी स्पेनचं चक्रव्यूह, आजच्या सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष

मागील क्लब सीझनमध्ये लिव्हरपूलसाठी ४४ गोल करणारा सलाहला झालेल्या दुखापतीमुळे कूपर यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. चॅम्पियन लीगच्या अंतिम सामन्यात लिव्हरपूलकडून खेळताना झालेल्या दुखापतून सलाह सावरला असून आज त्याचा २६वा वाढदिवस आहे. आज असलेल्या विश्वचषकाच्या सामन्यात सलाह संघाला विजय मिळवून देऊन त्याच्या चाहत्यांना वाढदिवसाचे रिर्टन गिफ्ट देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आजच्या सामन्यामध्ये या खेळाडूंवर असतील साऱ्यांच्या नजरा 

उरुग्वे – लुइस सुआरेज, एडिनसन कावानीस, फर्नांडो मुसलेरा

इजिप्त – मोहम्मद सलाह, एसाल एलहादारी, कहराबा

सामन्याची वेळ – रात्री ८:३० वाजता (हिंदुस्थानी वेळेनुसार)

आपली प्रतिक्रिया द्या