यजमान म्हणून फक्त रशियाच लाभात

फिफाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजनासाठी यजमानपदाचा बहुमान मिळणे ही त्या देशाच्या महासंघासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. मात्र दिवसेंदिवस हाच बहुमान आता अधिकच खर्चिक होत आहे. कतार पहिल्यांदाच या यजमानपदाचा बहुमान भूषवत आहे. हे यजमानपद जाहीर झाल्यापासून 12 वर्षांत कतारला जवळपास 24 लाख कोटींचा खर्च करावा लागला. यंदाही कतारला सर्वाधिक खर्च इन्फ्रास्ट्रक्चरवर करावा लागला. यामध्ये 1964 ते 2018 पर्यंत फक्त यजमान रशियाच फायद्यात होता. रशियन महासंघालाच फक्त यातून 1600 कोटींची आर्थिक कमाई करता आली. इतर महासंघांसाठी हे यजमानपद तिजोरीवर भार टाकणारे ठरले.