रानवडला पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पंधरा जखमी

39

सामना ऑनलाईन, नाशिक

रानवड येथील निफाड साखर कारखाना परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पंधरा ग्रामस्थ आणि जनावरेही जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांनी आज या कुत्र्याला ठार केले.

उन्हाळ्यामुळे साखर कारखाना परिसरातील वस्तीवरील ग्रामस्थ घराबाहेर झोपलेले होते. सोमवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने पंधराजणांना जखमी केले, त्यात पांडुरंग शिवराम वाघ (७०), ताराबाई माधव सोमवंशी (७०), सावित्रीबाई चव्हाण (७०), यास्मिन अस्लम शेख (६), मधुकर दिलीप गायकवाड (२५), मीना रमेश वाघ (४०) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर पालखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात, निफाड ग्रामीण रूग्णालयात औषधोपचार करण्यात आले, पाचजणांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या कुत्र्याने सहा जनावरांनाही जखमी केले, आज सकाळीही धुमाकूळ घालत दोघांना चावा घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या