पंधरा लाख लोकांची संतापाची स्वाक्षरी

425

‘निर्भया’नंतर हैदराबाद प्रकरण… आणखी कुठेतरी गावात, निर्जन स्थळी नाहीतर भरबाजारात… असाच एखादा घृणास्पद, मानवतेला काळिमा फासणारा प्रकार घडत असेल… ‘ती’चा आर्त टाहो फुटत असेल आणि तिच्यावर अत्याचार करणाऱयांचे विकट हास्य अधिकच विकट होत असेल… हैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणाने सारेजण हादरले आहेत. देशभरात निषेधाचे मोर्चे आणि कॅण्डल मार्च निघत आहेत. देशातील अशाच 15 लाख जणांनी आपल्या संतापाला वाट मोकळी  करून दिली आहे, फक्त एक स्वाक्षरी करून!

हैदराबाद प्रकरणातील नराधम आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करा या मागणीसाठी आता ऑनलाइन याचिका दाखल होऊ लागल्या आहेत. मुंबईच्या डॉ. शंतनू कोडापे यांनी याची सुरुवात केली आणि तीन दिवसांत तब्बल 15 लाख लोकांनी या याचिकांवर स्वाक्षरी केली आहे.

change.org या वेबसाइटवर ही मोहीम सुरू झाली आहे. देशभरातील लोकांमध्ये हैदराबादमधील अमानुष कृत्याबद्दल प्रचंड संताप आहे. हाच संताप या याचिकांमधून व्यक्त होत असून अवघ्या 24 तासांत तब्बल 3 लाखजणांनी यावर स्वाक्षऱया केल्याचे ‘चेंज’ने सांगितले. डॉ. कोडापे यांच्या याचिकेवर तर 8 लाख जणांच्या स्वाक्षऱया आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या