जेवरी ग्रामस्थांनी मिळवला पहिला मान; मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 71 हजाराचा निधी

449

निलंगा तालुक्यातील माझ्या जेवरी गावच्या ग्रामस्थांनी गुरुवारी 71 हजार रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे सुपूर्द केला. रोज काबाडकष्ट करून उदरनिर्वाह भागवणाऱ्या ग्रामस्थांनी दिलेल्या निधीबद्दल उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. आज मी धन्य झालो, महाराष्ट्रातील इतक्या गावातून पहिल्यांदाच माझ्या गावकऱ्यांनी जमवलेला हा निधी केवळ मारुती मंदिरातून माईकवर सांगून गावकऱ्यांनी जमवला. मला अभिमान नाही तर गर्व आहे माझ्या गावचा. अनेक सामाजिक उपक्रमात मोठ्या हिरीरीने सगळे सहभागी होतात याचा आनंद आहे. आज तर मी धन्य झालो. अश्याच एकतेची देशाला गरज आहे. कोरोनाचे संकट परतवून लावण्यासाठी वज्र निर्धाराची गरज आहे. ही छोटीशी खारू ताईची मदत नक्कीच आमच्या गावकरयांसाठी अभिमानाची आहे.

धनादेश सुपूर्द प्रसंगी सरपंच संजय जेवरीकर, उपसरपंच वैजनाथ साळुंके, जागरूक नागरिक राजू तारे, शंकर तारे, माजी सरपंच खंडू जेवळें, हरीश माने, ऍड. उमेश तारे, बालाजी तारे यांची उपस्थिती होती. गावकऱ्यांनी दिलेल्या या सामाजिक सहभागाबाबत सरपंच संजय जेवरीकर यांनी आभार मानले.

आपली प्रतिक्रिया द्या