सरकारविरोधात आता गनिमी काव्याने लढा देणार

11

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलने केली. फडणवीस सरकारने आम्हाला आश्वासने दिली. पण त्यांची पूर्तता केलीच नाही. सरकारने फसवल्याची भावना मराठा समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारविरोधात गनिमी काव्याने लढा द्यायचा, असा निर्धार मराठा महासभेत आज करण्यात आला. तसेच मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तीव्र लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

संभाजीनगरमध्ये रविवारी मराठा महासभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यातील २२ जिह्यातील समन्वयकांची उपस्थिती होती. मराठा समाजाला फडणवीस सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी २ महिन्यांचा अल्टीमेटम सभेत देण्यात आला. आगामी काळात असहकार आंदोलन आणि मतदानाचा बहिष्कार टाकण्याचा आक्रमक पवित्रा घ्यायला हवा, असा सल्ला काही समन्वयकांनी दिला.

जिल्हानिहाय महासभा
आगामी काळात राज्यभरात गाव, तालुका, जिल्हा पातळीवर अशा प्रकारच्या मराठा महासभांचे आयोजन करण्यात येणार असून, मागण्या मान्य करण्यासाठी राज्य शासनाकिरोधात रान पेटवणार असल्याचा निर्णय समन्वयकांच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती प्रा. माणिकराव शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या