तुरूंग अधिकारी आणि रक्षकाची हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

27

सामना ऑनलाईन, अमरावती

अमरावतीच्या तुरूंगामध्ये एका अधिकारी आणि तुरूंग रक्षकामध्ये तुंबळ हाणामारी झाली. अगदी किरकोळ कारणावरून ही घटना झाल्याचं सांगण्यात येत आहे. जर अधिकारी आणि रक्षक अशा पद्धतीने मारामारी करायला लागले तर तुरूंगाची सुरक्षाव्यवस्था कशी व्यवस्थित राहील असा प्रश्न या घटनेननंतर विचारला जात आहे.

शरद माळशिकारे हे तिथले तुरूंग अधिकारी आहेत. तर संजय इसाटे हे कारागृह रक्षक आहेत. माळशिकारे सोमवारी मध्यरात्री ३ वाजता बरॅकची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी इसाटे यांच्याकडून कैद्यांच्या गणतीचा अहवाल मागितला. या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद इतका टोकाला पोहोचला की दोघांनी एकमेकांना काठीने मारहाण करायला सुरूवात केली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. माळशिकारे आणि इसाटे या दोघांना एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली असून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या