हल्क बनला थॉरचा शत्रू

12

सामना ऑनलाईन,मुंबई
‘थॉर’ मालिकेमधील पुढचा भाग म्हणजेच ‘थोर रॅगनारोक’ चा ट्रेलर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या भागामध्ये थॉरचा मुकाबला एका खलनायिकेशी होणार आहे. हेला असं या पात्राचं नाव असून ती एका फटक्यात थॉरच्या हथोड्याच्या ठिकऱ्या उडवते असं ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. थॉर आणि त्याचा भाऊ लोकी या दोघांना हरवत ती असगार्ड वर कब्जा करते. आपलं राज्य पुन्हा मिळवण्यासाठी थॉरपुढे आव्हान ठेवण्यात येतं ते म्हणजे लढाई जिंकण्याचं. ही लढाई होणार असते ती त्याचा अपराजित मित्र ‘हल्क’शी. पाहा या चित्रपटाचा हा ट्रेलर

आपली प्रतिक्रिया द्या