पार्किंग वादातून ज्यूस सेंटरच्या मालक, नोकरावर चाकूहल्ला

आरोपी सिसिटीव्ही कॅमेरात कैद

उल्हासनगर

काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास ज्यूस सेंटरचे दुकान बंद करत असताना,दोन तरुणांनी शटर समोरच मोटरसायकल उभी केली.त्यातून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीतून आठ ते नऊ तरुणांनी ज्यूससेंटरच्या मालक,नोकरावर चाकूहल्ला केला आहे.त्यात दोघे गंभीर जख्मी झाले असून आरोपी तरुण सिसिटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहेत.

कॅम्प नंबर तीन मध्ये निर्मला ज्युस सेंटरचे दुकान आहे. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी मालक पवन गुप्ता आणि कामगार इशाद अली यांना दिल्या. त्यानुसार दुकान बंद करत असतानाच, दोन तरुणांनी दुकाना समोरच मोटरसायकल उभी केली. दुकान बंद झाले. मोटरसायकल बाजूला करा, असे मालकाने सांगितल्यावर या दोघांनी त्यांच्या मित्रांना बोलावले व आठ ते नऊ तरुणांनी पवन, इशाद या दोघां वर चाकू हल्ला केला. त्यात हे दोघे गंभीर जख्मी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या