तुमची लढाई टीव्ही वर सोडवा, सरन्यायाधीश बोबडे यांनी भाजप नेत्याला सुनावले

1117
justice-bobade

सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भाजप नेत्याला सुनावले आहे. तुमचा लढा टीव्ही वरील डीबेटमध्ये सोडवा असे बोबडे यांनी भाजप नेत्याला सांगितले. पश्चिम बंगालच्या राजकीय हत्याकांडावरील याचिकेवर सुनावणी सुरू होती. तेव्हा बोबडे यांनी हे वक्तव्य केले आहे.

पश्चिम बंगालमधील भाजप नेते गौरव बन्सल यांनी राज्यातील राजकीय हत्याकांडवर जनहित याचिका दाखल केली होती. यावर सोमवारी सुनावणी सुरू होती. भाजपकडून गौरव भाटिया हे वकील युक्तिवाद करत होते. तर पश्चिम बंगाल सरकारकडून कपिल सिब्बल बाजू लढवत होते.

सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश बोबडे म्हणाले की, अनेक पक्ष आपले राजकीय झगडे सोडवण्यासाठी कोर्टाचा वापर करत आहेत. इथे पण दोन्ही पक्षांचा तोच हेतू दिसतोय. दोन्ही पक्षांनी टीव्हीवर जाऊन आपली भांडणे सोडवली तर बरे होईल, अशी भांडणे करण्यासाठी न्यायालय ही जागा नाही असेही बोबडे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या