बिर्याणीवरून लखनौच्या रेस्टॉरंटमध्ये ‘बंदूक’ राडा

21

सामना ऑनलाईन । लखनौ

‘ऑर्डर’ दिल्यानंतर बिर्याणी वेळेत आणून न दिल्यावरून लखनौ येथील प्रेस क्लब शेजारच्या एका रेस्टॉरंटमध्ये बुधवारी ग्राहक आणि वेटर्स यांच्यात झालेल्या वादातून मोठाच राडा झाला. रेस्टॉरंट मालकाने आपल्याकडील बंदुकीच्या बट्टने ग्राहक असलेला वकील आणि त्याच्या मित्राला मारहाण केली.

या प्रकरणात पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाविरोधात खुनाचा प्रयत्न, शांततेचा भंग, दंगल माजवणे, प्राणघातक शस्त्र् बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मालकाचे नाव उत्तम सोमकर असे असून त्याने आपले वेटर्स, नोकरांच्या मदतीने मारहाण केलेल्या ग्राहकाचे नाव ऍड. सत्यक्रत असे आहे. तर त्याच्या सोबत रेस्टॉरंटमध्ये गेलेल्या मित्राचे नाव सतेंद्र सिंग असे आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी. के. उपाध्याय यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या