फिल्मफेअर पुरस्कार : विद्या बालन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर इरफान खान सर्वोत्कृष्ट अभिनेता

161

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडमधील आपल्या उत्कृष्ट कामाची सर्वोच्च पोचपावती समजला जाणारा ६३वा जियो फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत शनिवारी पार पडला. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. इरफान खानने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरलं, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालनने बाजी मारली. ‘हिंदी मीडियम’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला.

फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन शाहरुख खान आणि करण जोहर यांनी केलं. इरफान खानला ‘हिंदी मीडियम’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कार तर विद्या बालनला ‘तुम्हारी सुलू’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. विद्याने सहाव्यांदा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. याआधी तिला परिणीता, पा, इष्किया (क्रिटिक्स), द डर्टी पिक्चर आणि कहानी या चित्रपटांसाठी फिल्मफेअर मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अवॉर्ड) जायरा वसीम यांना मिळाला. ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मीडिअम
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलू
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अवॉर्ड) : जायरा वसीम, सीक्रेट सुपरस्टार
– सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट : हिंदी मीडियम
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
– सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)
-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)
– सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन)
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार)
– सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान)
– सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा- सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना- बद्रीनाथ की दुल्हनिया)
– सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा- सिनेमा जग्गा जासूस)

आपली प्रतिक्रिया द्या