मेजर नायर अमर रहे! शहीद मेजर नायर अनंतात विलीन

34

सामना ऑनलाईन । पुणे

जम्मू-कश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकड्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात मेजर शशीधरन नायर शहीद झाले. मेजर नायर यांच्या निधनामुळे त्यांच्या राहत्या परिसरात खडकवासला येथे शोककळा पसरली.

रविवारी शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या शहीद सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी पुणेकरांनी वैकुंठ स्मशानभूमीत गर्दी केली. अमर रहे, अमर रहे, शशीधरन नायर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लष्कराच्या पथकाने संगिनींच्या फैरी झाडत या वीरपुत्राला अखेरचा निरोप दिला

आपली प्रतिक्रिया द्या