अंतिम वर्षाच्या परिक्षेसाठी विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य

अंतिम वर्षांच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून निकाल घोषित करण्याची कामे पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये अभिमत विद्यापीठे आणि स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांना 100 टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे.

सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ते 31 ऑक्टोबर या काळात घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडयात जाहीर करण्यासाठी मोठया प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. परीक्षेच्या प्रश्न पत्रिका तयार करणे, उत्तर पत्रिका तपासणे, गुणपत्रिका, निकाल घोषित करणे तसेच फेरमुल्यांकन अशा असंख्य कामांसाठी विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची आवश्यक्ता भासणार आहे. त्यामुळे 100 टक्के उपस्थिती आवश्यक आहे. राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. ही कामे करताना कोरोनाच्या संसर्गाचा आळा घालण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे असे नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या