…म्हणून अर्थमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार

1839
ajit-pawar

अर्थसंकल्प मांडताना किंवा सभागृहात बोलताना आधीच्या सरकारवर किंवा केंद्रांत विरोधीपक्षाचे सरकार असल्यास त्यांच्यावर टीका करण्याची संधी सोडली जात नाही. मात्र महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मात्र याला फाटा देत जबरदस्त भाषण केले. अर्थसंकल्प वाचताना त्यांनी आधीच्या सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडण्यावर जोर दिला. तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवश्यक तेवढा निधी केंद्राने दिला नाही हे सांगतानाच त्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी जी मदत केली त्याबद्दल आभारही मानले.

‘हिंदूहृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर 20 ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे बांधणार. त्यापैकी 4 केंद्रे मूर्त स्वरूपात आकाराला येतील. यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचे आभार’ असेही अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या