वाहन उद्योगाला ओला-उबरचा फटका, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दावा

1267

वाहन उद्योगाला सध्या सगळ्यात मोठी झळ बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून आर्थिक मंदी म्हणत सरकारच्या आर्थिक धोरणांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. त्यासंदर्भात बोलताना अर्थमंत्री यांनी वाहन उद्योगाला बसणाऱ्या फटक्यासाठी थेट ओला-उबर सेवांना जबाबदार धरले आहे. वाहन उद्योगावर सध्या BS6चा परिणाम दिसतो आहे आणि वाहन खरेदी करण्यापेक्षा ओला-उबर सेवा बऱ्या असा विचार लोक करू लागल्याने वाहन उद्योग अडचणींना सामोरे जात असल्याचे अर्थमत्र्यांनी म्हटले आहे.

हिंदुस्थानात आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका वाहन उद्योगाला (ऑटो मोबाईल) बसला आहे. अनेक मोठ्या कंपन्यांवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले आहे. टोयोटा मोटर्स आणि हुंडाई मोटारच्या वाहनांची विक्री देखील घटली असून त्यांनी गाड्यांच्या उत्पादनात कपात केल्याचेही बोलले जात आहे. अशोक लेलँड कंपनीने देखील कर्मचाऱ्यांना पाच दिवसाची सुट्टी देऊन काम बंद ठेवल्याचे वृत्ता आधी आले होते. वाहन उद्योगात यामुळे नाराजी पाहायला मिळत आहे.

‘ही’ देते फक्त 20 पैशात 1 किलोमीटरचा मायलेज  

 

आपली प्रतिक्रिया द्या