अंगठीवरून पटवली मृताची ओळख; वसई रेल्वे पोलिसांची कामगिरी

विरार रेल्वे स्थानकात एक्स्प्रेससमोर आत्महत्या केलेल्या व्यक्तीची अखेर वसई रेल्वे पोलिसांनी अंगठीवरून ओळख पटवली आहे. रवींद्र रघुनाथ पाटील असे मृताचे नाव आहे. वसई रेल्वे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

लोकल अपघातात मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटवणे कठीण असते. छिन्नविच्छिन्न मृतदेह रेल्वे पोलीस शवविच्छेदन पेंद्रात नेतात. त्यानंतर रेल्वे पोलीस अपमृत्यची नोंद करून मृताच्या नातेवाईकाचा शोध घेतात. बारा दिवसांपूर्वी विरार रेल्वे स्थानकात रात्री पावणे दहा वाजता वृद्धाने एक्सप्रेससमोर येऊन आत्महत्या केल्याची माहिती स्टेशन मास्तरने वसई रेल्वे पोलिसांना दिली. त्या माहितीनंतर वसई रेल्वे पोलीस घटनास्थळी गेले. एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या केल्याने रवींद्रचा मृतदेह काही अंतर पुढे गेला होता. तसेच रवींद्रच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक फोन आढळून आला. त्या पह्नचे दोन तुकडे झाले होते. त्यामुळे रवींद्रची ओळख पटत नव्हती.

वसई रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. वरिष्ठ निरीक्षक इंगवले यांच्या पथकातील जाधव, माने, मोरे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान रवींद्र हे विरार येथून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वसई रेल्वे पोलिसांनी विरार रेल्वे पोलिसांना पह्न करून रवींद्रच्या नातेवाईकांची माहिती घेतली. पोलिसांनी रवींद्रच्या नातेवाईकांना पह्न करून बोलावले. चेहऱ्याचा चेंदामेंदा झाल्याने रवींद्रची ओळख पटत नव्हती. अखेर पोलिसांनी रवींद्रच्या नातेवाईकांना एक अंगठी दाखवली. ती अंगठी रवींद्रची असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून रवींद्रची ओळख पटली. पोलिसांनी रवींद्रचा मृतदेह नातेवाईकांकडे स्वाधीन केला. रवींद्रच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही.