कविता कौशिक अडकणार लग्नाच्या बेडीत 

मुंबई – सब टिव्हीच्या ‘एफआयआर’ या गाजलेल्या मालिकेतील प्रसिद्द अभिनेत्री कविता कौशिक येत्या २७ जानेवारीला तिचा बॉयफ्रेण्ड रोहित बिस्वास सोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. कविता व रोहित हे भगवान शंकराचे भक्त असल्यामुळे त्यांनी केदारनाथ या पवित्र ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘रोहित व मी शिवभक्त असल्यामुळे आम्ही आमच्या नव्या आयुष्याची सुरवात भगवान शंकराच्या आर्शिवादाने करणार आहोत. त्यासाठी आम्ही केदारनाथला लग्न करण्याचे ठरवले आहे.’ असे कविताने एका मुलाखतीमध्ये सांगितले. रोहित बिस्वास हा दिल्लीतील व्यावसायिक असून तो व कविता गेल्या वर्षभरापासून एकमेकांना डेट करत आहेत.  एफआयर मालिकेतील कविताची ‘चंद्रमुखी चौटाला’ या महिला पोलिस अधिकाऱयाची विनोदी भूमिका प्रचंड गाजली आहे. कविता या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या