संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल

सामना ऑनलाईन । पुणे

अनिता सावळे या महिलेच्या तक्रारीवरून शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी हा गुन्हा शिरूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांचे शिव प्रतिष्ठान आणि मिलिंद एकबोटे यांच्या हिंदू एकता आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाकडे आलेल्या जमावावर दगडफेक केली, हिंसाचार भडकवला, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर आता संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्याविरुद्ध पिंपरीत गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या