संजय निरुपम यांच्यावर गुन्हा

30

सामना ऑनलाईन । मुंबई

मालाड रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मनसेवाल्यांकडून फेरीवाल्यांना मारहाण होत होती तेव्हा पोलीस गप्प बसले होते. यापूढे फेरीवालेदेखील जशास तसे उत्तर देतील. आता विनंती नव्हे, युद्ध होईल. संघर्ष अत्यंत भीषण होईल आणि तो झालाच पाहिजे, अशी चिथावणी निरुपम यांनी कार्यकर्ते व फेरीवाल्यांच्या जमावाला दिली होती.

मनसे कार्यकर्त्यांनी आज मालाड येथील फळ मार्केटमधील फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केले. मालाड पोलिसांनी ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात फळविक्रेत्यांच्या फळाची नासधूस केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तर लाकडी बांबू, लोखंडी रॉडने सुशांत माळवदे व अन्य एकावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी सहाजणांविरोधातदेखील मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या