लाच मागितल्याप्रकरणी महिला सरपंच आणि पतीविरुध्द गुन्हा दाखल

45

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर तालूक्यातील तांदूळजा येथील महिला सरपंच व तिच्या पतीला लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. मंगल भास्कर लांडगे आणि त्यांचे पती भास्कर रामा लांडगे असे या दोघांचे नाव असून ५००० रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मनरेगा योजनेअंतर्गत गावातील एका व्यक्तीला विहीर मंजूर झाली होती. या विहिरीसाठी एकूण ८६,३१० रुपये इतका खर्च होणार होता. दरम्यान या विहीरीसाठी सरपंच मंगल भास्कर लांडगे आणि त्यांचे पती भास्कर रामा लांडगे यांनी ५००० रुपयांची लाच मागितली होती.

त्या व्यक्तीने ३००० रूपये देण्यास कबुल झाला. परंतु त्या दोघांना संशय आल्यानंतर त्यांनी ते पैसे घेणे टाळले. दरम्यान गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगल लांडगे व भास्कर लांडगे अद्याप फरार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या