मुख्यमंत्री महोदयांचा कुत्रा मेला, डॉक्टरांवर गुन्हा दाखल

1114

तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या निवासस्थानाती एका कुत्र्याचे निधन झाले. या प्रकरणी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलगर्जीपणामुळे कुत्र्याचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉक्टरवर ठेवण्यात आला आहे.

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे शासकीय निवास स्थान प्रगति भवन मधील हस्की या पाळीव श्वानाचा मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टर रणजीत आणि खाजगी पशुवैद्यकीय चिकित्सालयचे मॅनेजरच्या विरोधात हैद्राबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांच्या विरोधात आयपीसी 429 आणी पशू कुरता प्रतिंबध अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हस्की हा कुत्रा 11 महिन्याचा होता. 11 सप्टेंबर रोजी डॉक्टरांनी त्याला एक इंजेक्षन दिले होते. त्यानंतर हस्कीचा मृत्यू झाला होता. शासकीय निवासस्थानातील कुत्र्यांची देखभाल करणार्‍या आसिफ अली खानने तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. 

आपली प्रतिक्रिया द्या