‘मिर्झापूर’ विरोधात FIR, शहराची प्रतिमा खराब केल्याचा आरोप

ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइम आपल्या वेब सीरीजमुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. वेब सीरीज ‘तांडव’ नंतर, आता ‘मिर्झापूर’ शो वर वाद सुरू झाला आहे. ‘मिर्झापूर’च्या निर्मात्यांच्या विरोधात मिर्झापूर शहरात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार सोमवारी ‘मिर्जापुर’च्या निर्मात्यासह अॅमेझॉन प्राइम विरोधात देखील दाखल करण्यात आलेला आहे.

तक्रार दाखल करणाऱ्याचे नाव अरविंद चतुर्वेदी आहे. हे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केले आहे.

‘द इंडियन एक्सप्रेस’ च्या वृत्तानुसार एफआयआरमध्ये अॅमेझॉन प्राइम आणि शो चे निर्माते रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि भौमिक गोंडलिया यांच्या नावाचा समावेश आहे. मिर्झापूरचे एसपी, अजय कुमार यांनी सांगितले की, “अरविंद चतुर्वेदी यांनी आरोप केला आहे की, शोमध्ये आक्षेपार्ह मजकूर आणि अवैध संबंधांचे चित्रिकरण आहे. यामुळे, तक्रारीच्या आधारावर, निर्माते आणि प्लॅटफॉर्मच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.”

याआधी देखील झाली होती तक्रार

 

‘मिर्झापूर’ वेबसिरीज विरोधात महिला खासदाराने थोपटले दंड; पीएम मोदी, सीएम योगींकडे कारवाईची मागणी

 

मिर्झापूरच्या खासदार आणि अपना दलच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनुप्रिया पटेल यांनी देखील या वेब सीरीजच्या विरोधात कारवाईची मागणी केली होती. वर्ष 2020 मध्ये वेब सीरीजचा दुसरा सीजन रिलीज झाल्यानंतर पटेल यांनी पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री योगी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सीरीज विरोधात चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच कडक कारवाई व्हावी अशी मागणी देखील केली होती.

‘मिर्झापूर’ वेब सीरीज आपल्या संवादांमुळे गेल्या वर्षीपासून चर्चेत आणि वादात राहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या