यशराज फिल्मच्या संचालकांविरुद्ध गुन्हा, 100 कोटींची फसवणूक

545

कंपनीचे अधिकार डावलून कंपनीच्या सभासदांच्या विविध चित्रपट/गाणी लिहिणार्‍या लेखक/कम्पोझर यांच्या रॉयल्टीची 100 कोटींची रोकड त्यांना न देता ती रक्कम स्वतःसाठी वापरून फसवणूक केल्या प्रकरणी यशराज फिल्म कंपनीच्या संचालक व अध्यक्षाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

द इंडियन परफॉमिंग राईट्स सोसायटी लिमिटेड कंपनीला त्यांचे सभासद लेखक/कम्पोझर यांची रॉयल्टी जमा करण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. परंतु 2012पासून ते 11 नोव्हेंबर 2019पर्यंत मे. यशराज फिल्म प्रा.लि. कंपनीचे संचालक व अध्यक्षांनी आपसात संगणमत करून द इंडियन परफॉमिंग राईट्स कंपनीच्या सभासदांच्या विविध चित्रपट/गाणी लिहिणार्‍या लेखक/कम्पोझर यांच्या रॉयल्टीची 100 कोटींची रोकड परस्पर जमा करून ती संबंधितांना दिली नाही. उलट त्या रकमेचा स्वतःसाठी वापर केल्याची तक्रार द इंडियन परफॉमिंग राईट्स सोसायटी लिमिटेड कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापिका शीतल मदनानी यांनी दिली. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने यशराज फिल्म कंपनीच्या संचालक व अध्यक्षांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या