हिंगोली : हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर गुन्हा

5349

कावड यात्रेतील शिवसैनिक व शिवभक्तांसमोर हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारे भाषण केल्याप्रकरणी शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शहरातील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात अपयशी ठरणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर कार्यवाही न करणारे पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मुस्लिमांच्या समोर लोटांगण टाकल्याचे बोलले जाते.

santosh-bangar

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित केलेल्या भव्यदिव्य कावड यात्रेवर हिंगोलीतील धर्मांध मुस्लिमांनी 12 ऑगस्ट रोजी दगडफेक करून जातीय तेढ निर्माण केला होता. कळमनुरीहुन हिंगोलीत कावड यात्रा आल्यावर शिवसैनिक व शिवभक्तांच्या आग्रहाखातर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भाषण करून हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला होता. या भाषणादरम्यान संतोष बांगर यांनी कुठल्याही धर्मावर टीका न करता हल्लेखोरांमध्ये हिंमत असेल तर समोरासमोर लढा असे खुले आव्हान दिले होते. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात हिंदूंवर झालेला अन्याय वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसार सहन केला जाणार नाही असा इशाराही जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिला होता.

santosh-bangar1

घटनेला सहा दिवस उलटल्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना उपरती झाली आहे. आज 18 ऑगस्ट रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्यावर हिंदू देवदेवतांचे व धर्माचे दाखले देऊन हिंगोलीच्या नांदेड नाका भागात प्रक्षोभक भाषण केल्याचा गुन्हा स्वतः फिर्याद देऊन दाखल केला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन हा गुन्हा नोंदवल्याचे पोलीस निरीक्षकाने लेखी कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार व नांदेडचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल या दोघांनी हिंगोली शहरात धर्मांध मुस्लिमांनी कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवून देखील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची पाठराखण करत पक्षपाती भूमिका घेतली आहे.


आपली प्रतिक्रिया द्या