प्रक्षोभक भाषण दिल्याप्रकरणी वसीम रिझवी उर्फ जितेंद्र त्यांगींसह इतरांविरुद्ध FIR दाखल

dharma-sansad

हरिद्वार येथील ‘धर्म संसदेत’ चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी उत्तराखंड पोलिसांनी वसीम रिझवी उर्फ​ जितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. उत्तराखंड पोलिसांनी ट्विट करून ही माहिती दिली. पोलिसांनी ट्विटरवर लिहिले की, “सोशल मीडियावर एका विशिष्ट धर्माविरुद्ध चिथावणीखोर भाषणे देऊन द्वेष पसरवण्याच्या व्हायरल व्हिडीओची दखल घेत, वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांविरुद्ध कोतवाली हरिद्वार येथे कलम 153A आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.”

जितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांवर हरिद्वारमध्ये झालेल्या ‘धर्म संसद’ कार्यक्रमात घाबरवणारे आणि हिंसक भाषणे केल्याचा आरोप आहे. भडकाऊ भाषणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. तत्पूर्वी, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट केले होते की, त्यांनी त्यांच्या पक्षाच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्षांना धर्म संसदेत भडकाऊ भाषण करणाऱ्या सर्व वक्त्यांवर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.