मारूती-सुझुकीच्या शोरूमला भीषण आग, दोघांचा मृत्यू

29

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

नवी मुंबईतील खारघर येथील मारुती सुझुकीच्या शोरूमला भीषण आग लागली होती. आगीत दोन कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग एवढी भीषण होती की आगीत काही मारुती कार जळून खाक झाल्या आहेत. शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

खारघर येथे असलेल्या आदित्य प्लॅनेट बिल्डिंगमधील मारुती सुझुकीच्या शोरुमला पहाटे ५ वाजता आग लागली. पहाटेच्या वेळी शोरुममधून धूर बाहेर येत असल्याचं निदर्शनात आल्यावर लगेचच नागरिकांनी पोलिस आणि अग्निशामक दलाला बोलावले. मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर बिल्डिंगमधील रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. मृतांमध्ये शोरुमच्या दोन वॉचमनचा होरपळून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. कृष्ण कुमार आणि जितेंद्र कुमार अशी मृतांची नावं आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या