मुंबई – रिगल टॉवरच्या १७ आणि १८व्या मजल्यावर भीषण आग

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईतील वाळकेश्वर भागात असणाऱ्या रिगल टॉवरच्या १७ आणि १८व्या मजल्यावर आग लागली आहे. आगीमुळे इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात धूर दिसून येत होता. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आगीमध्ये जिवीत अथवा वित्तहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीट करत या घटनेची माहिती दिली आहे.

पाहा व्हिडिओ –