साकीनाका येथे भंगाराच्या गाळय़ाला भीषण आग; तिघेजण जखमी

साकीनाका येथे न्यू इंडिया मार्पेटमध्ये आज सकाळी भंगाराच्या दुकानाला आग लागली. आगीनंतर झालेल्या सिलिंडरच्या स्पह्टात तिघे जण जखमी झाले. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

साकीनाका येथील खैरानी रोडवर असलेल्या न्यू इंडिया मार्पेट परिसरात भंगार, रंग आणि काही केमिकलचे गाळे आहेत. सकाळी साडेदहा वाजता भंगाराच्या एका गाळ्याला आग लागली. आगीनंतर या गाळ्यातील सिलिंडरचा स्पह्ट झाला. या स्पह्टात तिलकराम (17), रफीक अहमद (40) आणि अमित पुमार (38) जखमी झाले. या तिघांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा परिसर दाटीवाटीचा असल्याने ही आग पसरण्याचा धोका होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ कार्यवाही करत आग नियंत्रणात आणली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख पैलाश हिवराळे यांनी दिली.

धारावीत एक जण नाल्यात वाहून गेला

धारावीत आज दुपारी किमकर चौकाजवळील नाल्यात पडून एक जण वाहून गेला. 60 फुट रस्त्यावर ही घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस आणि पालिकेकडून मदत आणि बचावकार्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आपात्कालीन नियंत्रण कक्षाने दिली.

प्रत्येक व्यावसायिकाने अग्निसुरक्षेची काळजी घ्यावी – महापौर

महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाकडे भेट घेऊन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. त्या म्हणाल्या, दाटीवाटीच्या जागेमध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी अग्निसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. आगीच्या घटना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका फायर ऑडिट करून संबंधितांना वेळोवेळी नोटीस देत असते. नोटीस दिल्यानंतरही संबंधित व्यावसायिकांनी आग प्रतिबंधक उपकरणे बसवणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यावसायिकाने ती त्यांची जबाबदारी समजून वागले पाहिजे. राहण्याच्या आणि व्यवसायाच्या ठिकाणी आग प्रतिरोधक उपकरणे असलीच पाहिजे, असे आवाहन महापौरांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या