वसईतील कंपनीत भीषण आग

12

सामना प्रतिनिधी । वसई

वसईतील नवघरपूर्व नेमिनाथ इंडस्ट्रीयल इस्टेट यथे भीषण आग लागली. कंपनीत ज्वालाग्रही रसायने असल्याने आग झटकन वाढल्याचे कळते. सकाळी ८ पर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. तरी देखील आग आटोक्यात आली नव्हती.

पहाटे ३.४५ च्या सुमारास कंपनीत अचानक स्फोटाचे आवाज झाले. त्याबरोबर कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर धाव घेतली. स्फोटात कंपनीच्या कंपाउंडचा काही भाग पडला. रसायने असल्याने आग थोड्याचवेळात सगळीकडे पसरली. कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला आणि घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवांनाचे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम काही तास सुरू होते. सुदैवानं या घटनेत जीवितहानी झालेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या