धुळ्यात एकाच घरातील ५ जणांचा गुदमरून मृत्यू

44

सामना ऑनलाईन । धुळे

धुळ्यात मध्यरात्री घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. धुळे शहरातील अकबर चौकातील धना डाळ बोळीतील घराला ही आग लागली होती. मृतांमध्ये २ महिला ३ पुरुषांचा समावेश आहे. संपूर्ण परिसरात या घटनेने दु:खाचे सावट पसरले आहे.
राम शर्मा यांच्या घराला ही आग लागली होती. आगीत त्यांच्यासह त्यांची आई, पत्नी आणि दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. दोन मजली हे घर असून घराच्या खालच्या मजल्याला ही आग लागली होती. घरातील सदस्य वरच्या मजल्यावर झोपले होते. घरातून बाहेर न पडता आल्याने त्यांचा याठिकाणी मृत्यू झाला. आग लागल्यानंतर जवळपास एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

आगीत मृत झालेल्या व्यक्तींची नांव
(१) शोभाबाई छाजुलाल शर्मा (वय अंदाजे ६२ वर्ष)
(२) राम शर्मा (वय अंदाजे ४५ वर्ष)
(३) जयश्री राम शर्मा (वय अंदाजे ३५ वर्ष)
(४) साई राम शर्मा (वय अंदाजे १२ वर्ष)
(५) राधे राम शर्मा (वय अंदाजे १० वर्ष)

आपली प्रतिक्रिया द्या