पेटत्या बसमध्ये प्रवाशांना सोडून ड्रायव्हर पळाला, जीव वाचवण्यासाठी बसमधून उड्या

bus-fire-near-indapur

सामना प्रतिनिधी । लातूर

लातूर येथून मुंबईकडे जाणारी ग्लोबल ट्रॅव्हल्स इंदापूर जवळ पहाटे सव्वा तीनच्या सुमारास जळून खाक झाली. ट्रॅव्हल्सला आग लागल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक आणि क्लिनर दोघे पळून गेले.

लातूर येथून रात्री नऊ वाजता मुंबईसाठी निघालेली ग्लोबल ट्रॅव्हल्स एजन्सी महाराजा ट्रॅव्हल्स ही मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास सोलापूर-पुणे रस्त्यावरील इंदापूर जवळ जळून खाक झाली. प्रवाशांनी ट्रॅव्हल्स चालकास गाडीच्या डिझेलचा वास येत असल्याचे सांगितले होते मात्र त्याने कोणाचे ऐकले नाही. गाडीतून धूर येण्यास सुरुवात होताच चालकाने क्लिनरसह पलायन केले. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून बाहेर उड्या मारल्या. त्यामध्ये काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र गाडीतील सर्व प्रवाशांचे साहित्य जळून खाक झाले. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

fire-in-bus