खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या टाकाऊ साहित्यातले आग

चिपळूण तालुक्यांतील खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिल कंपनीच्या टाकाऊ साहित्याला रविवारी दुपारी अचानक आग लागली. परिसरात आगीच्या धुराचे लोट पसरले. आगीमध्ये कंपनीचे टाकाऊ साहित्य जळून नुकसान झाले. लोटेतील कंपनीत झालेल्या स्फोटांची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली.

थ्री एम पेपर मिलच्या टाकाऊ साहित्याला आग लागल्याची घटना समजताच अग्निशमन बंबाच्या सहाय्याने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, तासाहून अधिक काळ लोटला तरी आग आटोक्यात आली नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. लोटेतील घरडा केमिकल्स तर आज रविवारी समर्थ केमिकल्स कंपनीत आग लागण्याची घटना घडली. समर्थ कंपनीतील आग विझते न विझते तोवर खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिलमध्ये आगीचे तांडव पहायला मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या