
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईजवळील बुचर बेटावरील तेलसाठय़ाला शुक्रवारी वीज पडल्याने भीषण आग लागली. बेटावरील ४५० कर्मचारी बोटीने मुंबईकडे परतत असताना ही आग लागल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्नीशमन दलाकडून सुरू आहेत.
विजांच्या कडकडाटासह शुक्रवारी दुपारनंतर सुरू झालेल्या पावसादरम्यान जव्हार बेटावरील बीपीसीएलच्या टँकरला आग लागली. जेएनपीटीच्या चार टँकरसह मुंबई फायर ब्रिगेडची अग्निशमन दलानेही घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ३२ हजार मेट्रिक टन कॅपेसिटी असलेल्या हायस्पिड डिझेल ऑइल साठ्य़ाला लागलेली आग भडकत असल्याने नियंत्रण मिळवण्यास अडचणी येत आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टने कर्मचाऱ्यांची कमतरता असताना गेल्या तीन वर्षांत अग्निशमन जवानांची भरतीच केली नसल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन जवानांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने करायची की कायमस्वरूपी याबाबतही प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. बेटावर जे अग्निशमन कर्मचारी आहेत ते निवृत्तीच्या उंबरठ्य़ावर आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी आग लागली तर अनर्थ घडू शकतो अशी भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.
#Visuals from Butcher Island: Thick smoke emerging out of fuel storage tanks which caught fire last night, fire fighting ops on. #Mumbai pic.twitter.com/dBriyJNNAg
— ANI (@ANI) October 7, 2017