सोयाबीनला लागलेल्या आगीत २ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान

10

सामना प्रतिनिधी । लातूर

जळकोट तालुक्यातील मौजे पाटोदा शिवारात कुणा अज्ञाताने८० क्विंटल सोयाबीन जाळून २ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. या प्रकरणी एकनाथ व्यंकट नागरगोजे रा.पाटोदा यांनी जळकोट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अज्ञात इसमाने आग लावून देऊन ८० क्विंटल सोयाबीनचे नुकसान केले. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या