पंजाबमधील फिरोजपूरमध्ये कारगर गुरुद्वाराजवळ गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुचाकी वरून आलेल्या दोघांनी एका वाहनावर अंधाधुंद फायरिंग केली. या फायरिंगमध्ये गाडीमध्ये उपस्थित असलेल्या चार जणांपैकी तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वारामधून चारजण बाहेर आले आणि गाडीच्या दिशेने जात होते. यावेळी दोघेजण दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्या गाडीवर अंधाधुंद गोळीबार केला. त्यानंतर दोघेही दुचाकीवरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच पोलिसांच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेतला जात आहे.