पहा व्हिडीओ: मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवेवर संतप्त जमाव आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री 

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

मराठा आंदोलकांनी मुंबई -पुणे एक्स्प्रेस हायवे कळंबोली येथे रोखल्यानंतर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक करत गाड्या पेटवल्या. यावेळी हिंसक झालेल्या जमावावला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. यावेळी संतप्त जमावामध्ये आणि पोलिसांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली.