नागपूरमध्ये जगातील पहिले सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी ट्रायल सेंटर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ

709

कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी यशस्वी ठरत असून अनेक रुग्ण बरे होत आहेत. या थेरपीचा व्यापक प्रमाणावर वापर होण्यासाठी महाराष्ट्रात जगातील सर्वात मोठे प्लाझ्मा थेरपी ट्रायल सेंटर नागपूर येथे उभारण्यात आले. या सेंटरचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या उपचारात महाराष्ट्र जगाच्या पुढे आहे. महाराष्ट्र प्रयत्न आणि प्रयोग करणारे, धाडसी राज्य आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध आपण जिंकूच असा विश्वास व्यक्त केला.

राज्यात 23 वैद्यकीय महाविद्यालयात प्लाझ्मा थेरपीची सुविधा करण्यात आली आहे. नागपूर येथील शासकीय महाविद्यालयात प्लाटीना प्रोजोक्ट प्लाझ्मा थेरपी ट्रायल केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा बँक, प्लाझ्मा ट्रायल आणि ऊर्मजन्सी ऑथरायजेशन या चार सुविधांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाऊल पुढे टाकले आहे. आपण रडत नाही बसलो तर लढत आहोत. राज्यात एप्रिलमध्ये प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे परवानगी मागितली, पाठपुरावा केला, त्याला यश आले आहे.

क्हिडीओ वॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या सोहळ्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुंबईचे पालवमंत्री असीम शेख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख तसेच संबंधित जिह्यांचे पालकमंत्री आदी सहभागी झाले होते. त्यांनीही आपले विचार मांडून शुभेच्छा दिल्या.

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करा!
आता ज्या रुग्णांनी कोरोनाला हरवलं आहे त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा अन्य रुग्णांना देऊन त्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. 10 पैकी 9 रुग्ण आपण बरे केले कारण त्यांना वेळेत प्लाझ्मा वेळेत देऊ शकलो. त्यामुळे प्लाझ्मा देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत न थांबता आधीपासून तो देता येईल का यावर विचार व्हावा. बरे झालेल्या रुग्णांनी अन्य रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

प्लाझ्मा संकलनासाठी यंत्र पुरविणार- आरोग्यमंत्री
प्लाझ्मा थेरपी उपचार झालेल्या 90 टक्के रुग्णांना लाभ झाला आहे. राज्यात 23 वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यापैकी 17 ठिकाणी ही उपचार पद्धती कोविड रुग्णांसाठी सुरू होत आहे. जगात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी उपचार केली जाते. मात्र महाराष्ट्र पहिले राज्य आहे जेथे सौम्य तसेच गंभीर रुग्णांवर या थेरपीने उपचार केले जात आहेत. ज्या 10 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांची सुविधा नाही तेथे आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी लागणारे यंत्र पुरविले जाणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in या ठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या