इंग्लंडचा पहिला डाव 67 धावांमध्येच गडगडला

538

जोफ्रा आर्चरच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांमध्ये गुंडाळणाऱ्या यजमान इंग्लंडला मात्र पहिल्या डावात आपला ठसा उमटवता आला नाही. जोश हॅझलवूड, पॅट कमिन्स व जेम्स पॅट्टीनसन या तीन वेगवान गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांचा पहिला डाव 67 धावांमध्ये गडगडला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 बाद 155 धावा केल्या होत्या. ऍशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस शुक्रवारी खेळवण्यात आला.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. जो डेन्लीच्या 12 धावा वगळता इतर दहाही फलंदाजांना एकेरी धावसंख्याच करता आली. जोश हॅझलवूडने 30 धावा देत 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पॅट कमिन्सने 23 धावा देत 3 आणि जेम्स पॅट्टीनसनने 9 धावा देत 2 फलंदाज गारद केले.

आपली प्रतिक्रिया द्या