देशातील पहिले अत्याधुनिक ‘लेडीज स्पेशल वॉशरूम’

737

ठाण्यात TOILETEH$ प्रेमकथा
1 मेकअप रूम
2 चेंजिग रूम
3 बच्चेपंपनीचे डायपर चेंजिंग
4 वेटिंग रूम
5 स्तनपान कक्ष

जागतिक प्रसाधनगृह दिन विशेष

अत्यंत गलिच्छ प्रसाधनगृह…जागोजागी अस्वच्छतेचे साम्राज्य…पाण्याची कमतरता या वातावरणात महिलांकडून घराबाहेर पडल्यावर वॉशरूम वापरणे टाळले जाते. मात्र महिलांच्या पुचंबणा करणाऱया या समस्येवर उपाय म्हणून ठाण्यात देशातील पहिले अत्याधुनिक लेडीज स्पेशल वॉशरूम लूम अॅण्ड व्हिवर रिटेल्स या संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. 19 नोव्हेंबरला जागतिक प्रसाधनगृह दिनाच्या निमित्ताने या नव्या टॉयलेटचे लोकार्पण होणार असून मेकअप रूम, चेंजिग रूम, वेटिंग रूम, बच्चेपंपनीचे डायपर बदलण्यापासून त्यांना स्तनपान करण्यासाठी स्वतंत्र कक्ष येथे असल्याने हे ‘टॉयलेट’ महिलांसाठी ‘एक प्रेमकथा’ ठरणार आहे.

मुंबई-ठाणे परिसरात दररोज सरासरी 35 लाख महिला प्रवासी, विद्यार्थिनी, नोकरदार वूमन लोकल, बस, रिक्षाने प्रवास करतात. मात्र शहरांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था पाहून ते वापरण्याऐवजी महिला पाणी न पिणे, काहीही न खाणे, असे पर्याय निवडतात. अस्वच्छ प्रसाधनगृह वापरल्यास इन्फेक्शन तर न वापरल्यास महिलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. त्यामुळेच लूम अॅण्ड व्हिवर रिटेल्सचे संस्थापक मनीष केळशीकर व सहसंस्थापक शिवकला मुदलियार यांनी पाश्चिमात्य देशांच्या धर्तीवर हिंदुस्थानात ‘पावडर रूम’ अर्थात ‘वूलू’ म्हणजेच ‘वूमन्स लू’ ही संकल्पना आणली. यातील पहिली पावडर रूम ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील पोस्ट ऑफिससमोर असलेल्या जुन्या खंडेलवाल उपाहारगृहानजीक सुरू करण्यात आली आहे. नाममात्र शुल्कात ही अत्याधुनिक पावडर रूम महिलांना दररोज रात्री दहापर्यंत वापरता येणार आहे.

चहा, कॉफी, ज्यूस विथ म्युझिक
1. संपूर्णत वातानुपूलित असलेल्या पावडर रूममध्ये बसून महिलांना चहा, कॉफी, ज्यूस अशा पेयांचा   आस्वाद घेता येणार आहे. म्युझिक ऐकत अत्यंत शांतपणे पुस्तक, मासिके महिलांना चाळता येणार         आहेत.
2. शेकडो वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशात ब्रिटिशांच्या राण्या घराबाहेर पडल्यानंतर त्यांच्या आरामासाठी   पावडर रूम बांधण्यात आल्या होत्या. त्याच धर्तीवर हिंदुस्थानात पावडर रूम तयार केल्या जाणार     आहेत.
3. कॉलेज अथवा कामावरून थेट बाहेर पार्टीला जाणाऱ्या महिलांना या ठिकाणी चेंजिग रूम उपलब्ध   असणार आहे.
4. लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडणाऱया महिलांना बच्चेपंपनीचे डायपर बदलणे, त्यांना स्तनपान या   ठिकाणी करता येणार आहे.

मुंबईतही मुहूर्तमेढ रोवणार
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणाऱया या उपक्रमांतर्गत ठाण्यानंतर आता मुंबईतही जागा उपलब्ध होताच पावडर रूम सुरू केल्या जातील.
– शिवकला मुदलीयार,
सहसंस्थापक. लूम अॅण्ड व्हिवर रिटेल्स

आपली प्रतिक्रिया द्या