अक्षयचा ‘केसरी’ लूक पाहिलात का?

164

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षय कुमार नव्या वर्षात आपल्या चाहत्यांसाठी अनेक दर्जेदार चित्रपटांची मेजवानी घेऊन येणार आहे. अक्षयचा आगामी चित्रपट ‘पॅडमॅन’ची उत्सुकता असतानाच अक्षयने ‘केसरी’ या त्याच्या नवीन चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियावरून शेअर केला आहे. आपल्या ट्विटर हॅन्डलवरून हा फोटो शेअर करत अक्षयने त्यासोबत एक कॅप्शनही लिहिले आहे. त्याच्या या नव्या लूकसोबत त्याचे हे कॅप्शनही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘या क्षणी माझ्या मनात फक्त अभिमानाचीच भावना आहे. मी माझ्या नव्या वर्षाची सुरुवात ‘केसरी’ने करत आहे. आतापर्यंतच्या माझ्या सर्वात महत्त्वकांक्षी चित्रपटासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.’ या फोटोमध्ये अक्षय शीख सैनिकाच्या रुपात दिसत असून त्याची तिक्ष्ण नजर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अक्षयच्या डोक्यावर एक पगडी आहे. त्या पगडची रंगही केसरी आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अक्षयचा लूकही त्याच्या चाहत्यांना भूरळ घालतो आहे.

या चित्रपटाचे कथानक १८९७मध्ये ब्रिटिश इंडियन आर्मी आणि अफगाण-पश्तो मिलिट्री यांमध्ये झालेल्या सारागढीच्या युद्धावर आधारलेले आहे. या चित्रपटाविषयी बॉलिवूडमध्येही उत्सुकता असून हा चित्रपट आपला ठसा प्रेक्षकांच्या मनावर कितपत उमटवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. करण जोहर आणि अक्षय कुमार यांची निर्मिती असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करेल. २०१९ मध्ये होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आपली प्रतिक्रिया द्या