सवाचार लाख मतदार ठरवणार पनवेलचा पहिला महापौर

37

सामना ऑनलाईन, पनवेल

नवी मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनवेल महापालिकेसाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असून सवाचार लाख मतदार पनवेलचा पहिला महापौर ठरवणार आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

पनवेल महापालिका राज्यातील २७ वी महापालिका असून २० प्रभागांतून एकूण ७८ उमेदवार निवडून जाणार आहे. प्रत्येक प्रभागात चार उमेदवारांचे पॅनल असणार आहे. मात्र प्रभाग ११ व २० मध्ये प्रत्येकी तीन जागा आहेत. महापालिकेमध्ये पनवेल, नवीन पनवेल शहरासह खारघर, तळोजा, पाचनंद, खांदा वसाहतीचा भाग समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेल पालिकेचे क्षेत्र नवी मुंबई महापालिकेपेक्षा दहा टक्क्यांनी मोठे आहे.

पक्षीय बलाबल
शिवसेना ०४
शेकाप ०९
भाजप १७
राष्ट्रवादी ०४
काँग्रेस ०५
अपक्ष ०१

आपली प्रतिक्रिया द्या