मुंबई विद्यापीठांतर्गत संलग्नित महाविद्यालयाची एफवाय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली. या यादीत आर्टस् आणि सायन्स शाखेपेक्षा कॉमर्स शाखेच कटऑफ जास्त असल्याचे पाहायला मिळाले.
झेवियर्स महाविद्यालयाच्या आर्टस् शाखेची कट ऑफ 91.83 टक्के, तर माटुंगा येथील रुईया महाविद्यालयाच्या आर्टस् शाखेची कट ऑफ 92 टक्केवर पोहचली. माटुंगा येथील पोदार महाविद्यालयाच्या कॉमर्स शाखेची कटऑफ 95.50 टक्केवर पोहचल्याने कॉमर्स शाखेचा भाव वाढल्याचे चित्र आहे. तर सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचाही कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे
नामांकित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध जागांच्या तुलनेत अर्ज मोठय़ा संख्येने आल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत कटऑफ वाढल्याचे प्राचार्य सांगतात. तर काही ठिकाणी कटऑफ स्थिर असल्याचे दिसून येते. यंदा चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश मिळवणारी पहिलीच तुकडीही असणार आहे.
पोदार महाविद्यालयात बीकॉम इन बँकिंग अँड फायनान्स (बीएएफ), बीकॉम इन बँकिंग अँड इन्शुरन्स (बीबीआय) सारख्या सेल्फ-फायनान्स आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी कट ऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेला दिसतो. एचएसएनसी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या चर्चगेट येथील एचआर महविद्यालयात बीकॉमसाठी 96 टक्के कटऑफ पोहचल्याचे दिसते. यंदा वाणिज्य शाखेचे यंदा आकर्षण आहे.