मुलगी वयात आल्यावर ‘या’ राज्यांमध्ये पाळतात विचित्र परंपरा, वाचा सविस्तर…

6331

‘मासिक पाळी’ हा महिलेच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे 12 ते 13 वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. पाळीच्या दरम्यान महिलेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पहिल्यांदा पाळी आली की मुलगी वयात आली असे आपल्याकडे बोलले जाते. आजही आपल्याकडे पाळीदरम्यान महिला किंवा मुलींना चार दिवस बाजूला बसवले जाते, परंतु देशातील काही राज्यांमध्येही वेगवेगळ्या प्रथा आहेत.

केरळ
केरळमध्ये पहिल्या मासिक पाळीदरम्यान मुलीला एका खोलीत ठेवले जाते. त्या खोलीत एक दिवा लावला जातो. त्या दिव्याजवळ पितळेच्या भांड्यात नारळाची फुले ठेवली जातात. जितक्या त्या फुलाच्या कळ्या फुलतील तितकीच मुले त्या मुलीला होतील, अशी भावना यामागे असते.

कर्नाटक
कर्नाटकात पहिल्या मालिक पाळीदरम्यान घरात मोठा उत्सव केला जातो. घरातल्या आजूबाजूच्या महिला तिला ओवाळतात, आरती करतात. तिच्यासाठी गाणी गातात. तीळ आणि गुळापासून बनणारा ‘चिगली उंडे’ हा पदार्थ तिला खाऊ घातला जातो. हा पदार्थ खाल्याने मुलीच्या शरीरातून होणाऱ्या रक्तस्त्रावाला अडथळा येत नाही, अशी भावना यामागे आहे.

तमिळनाडू
तमिळनाडूमध्ये पहिली मासिक पाळी एका सणासारखी साजरी केली जाते. ‘मंजल निरट्टू विज्हा’ येथील परंपरेचे नाव आहे. ही परंपरा अगदी लग्नसमारंभासारखी असते. यात मुलीला हळद लावून आंघोळ घालतात. तिला सिल्कची साडी नेसवून दागिन्यांनी मढवतात. तिची पूजा करतात. यावेळी तिला भेटवस्तीही दिल्या जातात.

आसाम
आसाममध्ये पहिली मासिक पाळी दरम्यान ‘तुलोनी बिया’ ही परंपरा पाळली जाते. यादरम्यान त्या मुलीला एका वेगळ्या खोलीत ठेवले जाते. त्या खोलीत पुरुषांना जाण्याची संमती नसते. पुरुष चार दिवस त्या खोलीत जाऊ शकत नाहीत, त्या मुलीचा चेहराही ते पाहू शकत नाहीत. सुपाऱ्यांच्या दोन जोड्या लाल फडक्यात बांधून ते आजूबाजूच्यांना दिले जाते. सात विवाहित महिला त्या मुलीला अंघोळ घालतात. मग ती त्या सुपाऱ्यांची पुजा करते. यात त्या मुलीला अगदी नवरीसारखे सजवले जाते.

आपली प्रतिक्रिया द्या