मध्यावधी निवडणुकांचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या अंगलट; २ शीखांनी मारली बाजी

18

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंड संसदेच्या निवडणुकीमध्ये हिंदुस्थांनी वंशाच्या प्रीत कौर गिल आणि तनमनजीत सिंग देसी यांनी विजय प्रस्थापित करत इतिहास रचला आहे. ब्रिटन संसदीय निवडणुकीत जिंकणाऱ्या प्रीत कौर पहिल्या शीख महिला आहेत. प्रीत कौर लेबर पार्टीच्या विजयी उमेदवार आहेत. प्रीत कौर यांनी एजबस्टन येथे कंजर्वेटिव्ह पार्टीच्या कॅरोलिन स्क्वायर यांना पराभूत केलं आहे. ६९१७ मतांनी प्रीत यांनी हा विजय मिळवला आहे. तर लेबर पार्टीच्याच मनमनजीत सिंग यांनीही जवळपास १७ हजार मतांनी विजय मिळवला आहे.

theresa-may

ब्रिटनमध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. सत्तेत असलेल्या कंजर्वेटिव्ह पार्टीच्या नेत्या आणि पंतप्रधान टेरीजा मे यांचा मध्यावधी निवडणुकांचा निर्णय त्यांच्याच अंगलट आला आहे. गेल्यावर्षी ब्रेक्झिटच्या जनमतानंतर त्यांनी मध्यावधी निवडणुकांचा निर्णय घेतला होता. निवडणुकांआधी कंजर्वेटिव्ह पार्टीला स्पष्ट बहुमत मिळेळ असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र विरोधी लेबर पार्टीनं या निवडणुकांमध्ये मुसंडी मारत कंजर्वेटिव्ह पार्टीला चांगलाच दणका दिला आहे. टेरीजा बहुमतापासून दूर राहिल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्यसाठी दबाव वाढत आहे. मात्र टेरीजा यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. निवडणुकीचा निकाल त्रिशंकू असला तरी कंजर्वेटिव्ह पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र विरोधी पक्ष एकत्र झाल्यास टेरीजा यांना आपली सत्ता कायम राखनं कठीण होईल. त्यामुळेच टेरीजा यांना आपण केलेली चूक कदाचित लक्षात आली असेल.

आपली प्रतिक्रिया द्या